रास्ता रोको, रेल रोको, दगडफेकीमुळे मुंबईला लागला 'ब्रेक'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2018 05:03 PM2018-01-02T17:03:18+5:302018-01-02T17:13:32+5:30

सुरक्षेच्या कारणास्तव वडाळ्यातील शाळा लवकर सोडून देण्यात आल्या, विद्यार्थ्यांना घरी नेण्यासाठी शाळेबाहेर झालेली पालकांची गर्दी.

आंदोलक रस्त्यावर उतरल्याने चेंबूर येथील उड्डाणपूलावर झालेली वाहतूक कोंडी.

भीमा कोरेगाव येथे घडलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ वडाळ्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाबाहेर स्टुडन्ट्स फेडरेशन ऑफ इंडियातर्फे निदर्शने करण्यात आली.

हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काही भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

रेल रोको आंदोलनामुळे हार्बर मार्गावरील उभ्या असलेल्या गाडया.

काही ठिकाणी आंदोलकांनी फोडल्या बसेसच्या काचा.

रास्ता रोको सुरु झाल्यानंतर पवईमध्ये झालेली वाहतूक कोंडी