श्रीदेवींचे पार्थिव पाहून सलमान खानच्या भावनांचा फुटला बांध

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 11:44 AM2018-02-28T11:44:35+5:302018-02-28T11:44:35+5:30

श्रीदेवी यांचं पार्थिव मुंबईतील निवासस्थानी आणल्यानंतर सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी कपूर परिवाराच्या सांत्वनासाठी हजेरी लावली होती.

मंगळवारी (27 फेब्रुवारी) रात्री उशीरा सलमाननं कपूर परिवाराची भेट घेतली. श्रीदेवींचे पार्थिव पाहाताच सलमानला अश्रू अनावर झाले आणि तो ढसाढसा रडू लागला.

फक्त सलमान खानच नाही तर श्रीदेवींच्या कोट्यवधी चाहत्यांचे डोळे त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे पाणावले आहेत.

सलमान खान व श्रीदेवी यांनी दोन सिनेमांमध्ये एकत्र काम केले होते. मात्र हे दोन्ही सिनेमा बॉक्सऑफिसवर फारसे चालले नाहीत.

यातील चंद्रमुखी सिनेमाची कहाणी स्वतः सलमान खाननं लिहिली होती.