फॅशन शोमध्ये सागरिका व झहीरवर थांबल्या सर्वांच्या नजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 03:02 PM2018-02-27T15:02:04+5:302018-02-27T15:02:04+5:30

भारतीय क्रिकेटर झहीर खान आणि सागरिका घाटगे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. #CaringWithStyle 2018 या फॅशन शोदरम्यान दोघांनी एकत्र रॅम्प वॉक केला. या शोमध्ये अन्य बॉलिवूड तसंच टीव्ही सेलिब्रिटीही सहभागी झाले होते.

मात्र, शोच्या आकर्षणाचे केंद्र बिंदू सागरिका घाटगे आणि झहीर खान होते.

24 नोव्हेंबर 2017ला लग्नबेडीत अडकल्यानंतर सागरिका घाटगे व झहीर खान यांनी मोठी सुट्टी एन्जॉय केली. मोठी विश्रांतीनंतर आता ते पुन्हा चाहत्यांसमोर आले आहेत.

यापूर्वी हे दोघं विराट-अनुष्काच्या रिसेप्शन पार्टीमध्ये दिसले होते.

दरम्यान #CaringWithStyle 2018 या फॅशन शोमधील या दोघांची ड्रेसिंग स्टाइल सर्वांना प्रचंड आवडली. या दोघांचेही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.