प्रिन्स हॅरी - मेगनचा 19 मे ला विवाह, मुंबईचे डबेवाले लंडनच्या राजघराण्याला पाठवणार आहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 05:58 PM2018-05-17T17:58:42+5:302018-05-17T17:58:42+5:30

मुंबईचे डबेवाले व लंडनचे राजघराणे यांचे भावनिक असे नाते आहे.

या भावनिक नात्याच्या मान ठेऊन लंडनच्या राजघराण्याने प्रिन्स चार्ल्स यांचे लग्नात मुंबईच्या डबेवालांना लंडनला बोलावले होते.

या राजघराण्या विषयी डबेवाल्यांन मध्ये विशेष असे प्रेम आहे.

या प्रेमापोटी आम्ही डबेवाले प्रिन्स हॅरी व मेगन मॅडम यांना लंडनला आहेर म्हणुन पाठवणार आहे.