शिल्पा शेट्टीचे फोटो काढणा-या फोटोग्राफर्सना बाऊंन्सर्सनी केली बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2017 10:57 AM2017-09-08T10:57:26+5:302017-09-08T11:01:29+5:30

खार येथील बॅस्टियन हॉटेलच्या बाहेर अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांचे फोटो काढणा-या दोन फोटोग्राफर्सना हॉटेलच्या बाऊंन्सर्सनी बेदम मारहाण केली.

फोटोग्राफर्सनी तक्रार दाखल केल्यानंतर खार पोलिसांनी रीतसर तक्रार नोंदवून दोन बाऊंन्सर्सना अटक केली आहे. सोनू आणि हिमांशु शिंदे हे दोन फोटोग्राफर्स जखमी झाले आहेत.

शिल्पा आणि राज कुंद्रा हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर काही फोटोग्राफर्सनी त्यांचे फोटो काढायला सुरुवात केली.

शिल्पा सुद्धा कोणतेही ओढेवेढे न घेता नेहमीच्या शैलीत कॅमे-याला वेगवेगळया पोझ देत होती.

दोन बाऊंन्सर्स तिथे आले व त्यांनी फोटोग्राफर्सना तिथून जाण्यास सांगितले. फोटोग्राफर्सनी बाऊंन्सर्सकडे दुर्लक्ष करुन फोटो काढण्याचे काम चालूच ठेवले.