'मिशन मान्सून'... मुंबईच्या रक्षणासाठी एनडीआरएफ जवान सज्ज; बघा त्यांची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 02:03 PM2018-06-06T14:03:03+5:302018-06-06T14:03:49+5:30

मुंबई शहर आणि उपनगरात पावसाळ्यादरम्यान आपातकालीन प्रसंग ओढावतात. कधी मिठीला पूर येतो, कधी दरड कोसळते तर कधी इमारतींची पडझड होते. अशा आपातकालीन प्रसंगादरम्यान मुंबईकर एकटवतात. (छाया- सुशील कदम)

महापालिका, अग्निशमन दल अशा घटनांदरम्यान सतर्क असते आणि त्यांचे कर्मचारी आपला जीव संकटात घातल मुंबईकरांची मदत करतात. (छाया- सुशील कदम)

अशाच काही आपातकालीन घटनांदरम्यान आणखी एक घटक मुंबईकरांच्या मदतीसाठी कायम सरसावलेला असतो. (छाया- सुशील कदम)

तो म्हणजे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक (नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स). हे पथक कायमच सतर्क असते. (छाया- सुशील कदम)

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हे पथक आणखी सतर्क होते. (छाया- सुशील कदम)

अशाच काहीशा जवानांच्या सरावाची, प्रशिक्षणाची टिपलेली ही छायाचित्रे. (छाया- सुशील कदम)