मुंबईतल्या 'या' ठिकाणी अवघ्या 100 रुपयांत पोटभर जेवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 09:06 PM2018-11-22T21:06:48+5:302018-11-22T21:16:25+5:30

असं म्हणतात, मुंबईत आलेला माणूस कधीही उपाशी राहत नाही. ही मुंबईत सर्वांचंच पोट भरते. परंतु त्यासाठी तुमच्या खिशात पैसे असावे लागतात. मुंबईतही अशी 6 हॉटेल्स आहेत जिथे भरपेट जेवण मिळते. शिवाजी पार्कमधलं आस्वाद हॉटेलही प्रसिद्ध आहे. आस्वाद खाण्यातील पदार्थांच्या दर्जात कोणतीही तडजोड करत नाही. त्यामुळेच ग्राहक आवर्जून आस्वादमध्ये जेवणासाठी येतात. आस्वादमध्ये मिसळ पाव, थालीपीठ खाल्ल्यास त्याची चव जिभेवर रेंगाळत राहील.

आमंत्रण- मुंबईतल्या नौपाडा भागातरी आमंत्रण हे हॉटेल असून, या हॉटेलमध्ये तुम्हा चविष्ट मिसळ पाव मिळतो, विशेष म्हणजे हे हॉटेल आठवड्याच्या सातही दिवस खुलं असतं.

रामनायक उडुपी रेस्टॉरंट- मुंबईतल्या माटुंग्यामधील उडुपी रेस्टॉरंटही प्रसिद्ध आहे. इथे तुम्हाला तामिळनाडूतल्या पदार्थांची चव चाखू शकता. दक्षिण भारतातील पदार्थही तुम्हाला इथे खाण्यास मिळतील.

मनीश लंच होम- माटुंगातल्या रुईया कॉलेजजवळील मनीश लंच होमही प्रसिद्ध आहे. तुम्हाला या हॉटेलमध्ये फिल्टर कॉफी मिळते. इथे तुम्हाला 100 रुपयांहून कमी किमतीत उत्तम दर्जाचं पदार्थ मिळतात.

क्यानी अँड को- दक्षिण मुंबईतल्या धोबी तलावाजवळच्या क्यानी अँड को हॉटेलही खवय्यांमध्ये लोकप्रिय आहे. इराणी कॅफेसारखेच पदार्थ इथे मिळतात. या हॉटेलमध्ये चिकन बर्गरही उत्तम दर्जाचं मिळतं. त्यासाठी तुम्हाला जास्त पैसेही मोजावे लागत नाहीत.

श्रीकृष्ण- दादरच्या सर्वाधिक गर्दीच्या ठिकाणी श्रीकृष्ण हॉटेलमध्ये चांगल्या दर्जाचा वडापाव मिळतो. तसेच इथे चांगल्या प्रतीची लस्सीही मिळते. 100 रुपयांहून कमी पैशांत तुम्ही इथे भरपेट जेऊ शकता.