मुलाच्या लग्नाआधी अंबानी कुटुंबाकडून 'अन्न सेवा'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 10:01 PM2019-03-08T22:01:16+5:302019-03-08T22:07:01+5:30

मुंबई : रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी आणि श्लोका मेहता 9 मार्च रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत.

आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांच्या लग्नाआधी अंबानी आणि मेहता कुटुंबियांनी मिळून अन्न सेवा करण्यास सुरुवात केली आहे.

मुंबईतील जियो वर्ल्ड सेंटरमध्ये सहा- सात दिवस हा 'अन्न सेवा कार्यक्रम' असणार आहे.

जियो वर्ल्ड सेंटरमध्ये जवळपास दोन हजार मुलांना यावेळी जेवण वाढण्यात आले. तसेच, या लहान मुलांसाठी म्युझिकल फाऊंडेशन शोदेखील आयोजित करण्यात आला होता.

विशेष म्हणजे, या मुलांना अंबानी कुटुंबाने स्वत: जेवण वाढलं. मुलगी इशा अंबानीच्या लग्नावेळीही अंबानी कुटुंबाने अशाच प्रकारे अन्न सेवा केली होती.

अंबानीच्या लग्नावेळीही राजस्थानातील उदयपूर येथे 5100 लोकांच्या जेवण्याची सोय करण्यात आली होती.