मुंबईत या वर्षी झाल्या या मोठ्या दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 06:44 PM2017-12-29T18:44:22+5:302017-12-29T18:48:28+5:30

लोअर परेल भागातल्या कमला मिल कंपाऊंडमधल्या हॉटेल मोजोला आग लागली आणि पाहता पाहता ही आग वा-यासारखी पसरली. आगीत गुदमरून 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यात 11 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे.

डीबाजार येथे दाटीवाटीच्या परिसरात उभी असलेली 117 वर्षे जुनी हुसैनी इमारत कोसळून 34 जणांचा बळी गेला. 47 जणांची ढिगाऱ्याखालून सुटका करण्यात आली तर दुर्घटनेत 15 जखमी झाले.

घाटकोपरमधील दामोदर पार्कजवळील सिद्धी साई ही चार मजली इमारत कोसळून17 जणांचा मृत्यू झाला तर 11 जखमी झाले. ही इमारत 1981 मध्ये बांधण्यात आली होती. पालिकेच्या नियमानुसार 30 वर्षांनी इमारतीचे स्टक्चरल ऑडित होणे आवश्यक आहे.

साकीनाका येथे पहाटे एका फरसाणच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत 12 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. साकीनाक्याच्या खैरानी रोडवरील मखारीया कम्पाऊंडमध्ये असलेल्या भानू फरसाण गाळा नंबर-१ या दुकानाला पहाटे भीषण आग लागली

29 सप्टेंबर 2017 (शुक्रवार) हा दिवस रेल्वे प्रवाशांसाठी खरोखरचा ब्लॅकफ्रायडे ठरला. पश्चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन स्थानकात अफवा पसरून तुफान चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू आला तर अनेक जण जखमी झाले होते