Birthday Special : माधुरी दीक्षितला 'हिरोईन' नाही तर 'हे' बनायचं होतं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2018 04:49 PM2018-05-15T16:49:37+5:302018-05-15T16:49:37+5:30

आपल्या दमदार अभिनय व मनमोहक अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा आज वाढदिवस आहे. 15 मे 1967 साली माधुरीचा मुंबईमध्ये जन्म झाला होता.

माधुरी दीक्षितला मायक्रोबायॉजिस्ट होण्याची इच्छा होती.

माधुरी दीक्षितला 'हम आपके हैं कौन' सिनेमासाठी 27,535,729 रुपये मानधन देण्यात आले होते. 90च्या दशकात अभिनेत्रींना देण्यात आलेले हे सर्वाधिक मानधन असल्याचे बोलले जाते.

1980 मध्ये माधुरी दीक्षितनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र 'तेजाब' सिनेमामुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली.

माधुरी दीक्षित बॉलिवूडमधील एकमेव अशी अभिनेत्री आहे जिला तब्बल 13 वेळा फिल्मफेअर बेस्ट अॅक्ट्रेस पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.