बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लोकल, टॅक्सींना प्रचंड गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 08:31 PM2019-01-09T20:31:19+5:302019-01-09T20:41:48+5:30

सलग दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या बेस्ट वाहतूक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आज मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. बेस्टची बससेवा जवळपास बंद असल्याने लोकलसेवेवर ताण पडला होता. (सर्व छायाचित्रे - सुशील कदम)

बेस्ट वाहतूक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बससेवा कोलमडल्यामुळे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह इतर स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली होती. (सर्व छायाचित्रे - सुशील कदम)

बेस्टची बससेवा बंद असल्याने बहुतांश मुंबईकरांना रिक्षा आणि टॅक्सीसेवेवर अवलंबून राहावे लागले. त्यामुळे अनेक ठिकाणी रिक्षा तसेच टॅक्सीसाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. (सर्व छायाचित्रे - सुशील कदम)

मात्र टॅक्सींच्या तुलनेत प्रवाशांची मोठी संख्या असल्याने अनेक प्रवाशांचा तासनतास खोळंबा होत होता. (सर्व छायाचित्रे - सुशील कदम)