INS तारासा : ... कारण मुंबई सुरक्षित रहावी, नौदलात झाला समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 07:15 PM2017-09-26T19:15:12+5:302017-09-26T19:21:51+5:30

जीआरएसई गोदीने बांधलेली ही 400 टनांची नौका आयएनएस तारासा नौदलात दाखल होण्यासाठी सज्ज झाली आहे.

मुंबईत समुद्राच्या मार्गे कोणी शत्रू दाखल होवू नये यासाठी समुद्रात गस्त घालण्यासाठी आयएनएस तारासा ही नौका आता नौदलाची ताकद बनणार आहे.

मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात या नौकेचा नौदलात समावेश करण्यात आला आहे.

ही नौका म्हणजे फास्ट अटॅक क्राफ्ट आहे, जी 65 किलोमीटर प्रतितासाचा वेग पकडते.

यामध्ये अनेक मशिनगन आहे आणि 30 एमएमची एक स्वदेशी गन ही मुख्य वैशिष्ट्य आहे.