करोंडो चाहत्यांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवणाऱ्या मर्लिन मुनरोचे खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2018 02:56 PM2018-06-01T14:56:09+5:302018-06-01T14:56:09+5:30

आजही ज्या हॉलिवूड अभिनेत्रीच्या सुंदरतेचे गोडवे गायले जातात त्या मर्लिन मुनरोचा आज वाढदिवस. मर्लिन मुनरोचे आजही लाखों चाहते आहेत. तिचे सिनेमे आजही आवडीने पुन्हा पुन्हा बघितले जातात. मर्लिन मुनरोने सर्वसामान्य प्रेक्षकांसोबतच अनेक दिग्गजांवरही जादूच केली होती. चला जाणून घेऊया मर्लिन मुनरोबाबत काही खास गोष्टी....

- मर्लिन मुनरोचा जन्म 1 जून 1926 मध्ये लॉस एंजेलिसमध्ये झाला होता. मर्लिनचं खरं नाव नोर्मा जीन मोर्टेसन असं होते. सिनेमात आल्यानंतर तिने आपलं नाव बदलून घेतलं.

16 वर्षांची असताना मर्लिनने लग्न केलं होतं. तिचा पहिला पती व्यवसायाने नाविक होता. त्यामुळे तो अनेक दिवस घराबाहेर रहायचा. अशात मर्लिनने एका फॅक्टरीमध्ये नोकरी केली. तिथे एका फोटोग्राफरच्या सल्ल्यानंतर तिने मॉडलिंग करणे सुरु केले. पुढे 1946 मध्ये तिचा घटस्फोट झाला आणि याच वर्षी तिने तिचा पहिला सिनेमा साईन केला.

मर्लिन मुनरोने 30 पेक्षा जास्त सिनेमात काम केलं. आजही तिच्या सुंदरतेची आणि अदाकारीची भरभरुन प्रशंसा केली जाते. तिची सर्वात जास्त गाजलेली भूमिका 'The Seven Year Itch' या सिनेमातील होती. याच सिनेमातील पांढऱ्या रंगांच्या ड्रेसमधील फोटो आजही अनेकांच्या लक्षात आहे. .या ड्रेसला सब वे ड्रेस असं नाव दिलं होतं.

मर्लिन मुनरोची सर्वात जास्त चर्चा तेव्हा झाली जेव्हा तिने 1962 मध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती जॉन केनेडी यांच्यासाठी खास हॅपी बर्थडे गाणं गायलं होतं. यावेळी तिने परिधान केलेला ड्रेस अनेकांच्या स्मरणात आहे.

- मर्लिन मुनरोने परिधान केलेले ड्रेस पुढे मोठ्या किंमतीत विकण्यात आहे. तिचा 'जेएफके ड्रेस' 1.2 मिलियन डॉलर आणि 'सब-वे ड्रेस' 5.6 मिलियन डॉलरमध्ये लिलावात विकला गेला.

मर्लिन मुनरो ही हॉलिवूडची अशी अभिनेत्री आहे जिच्या मृत्यूनंतरही तिच्या नावावर कोट्यवधींचा व्यवसाय केला जात आहे.

मर्लिन मुनरोचा मृत्यू झोपेच्या गोळ्यांचा डोस जास्त घेतल्याने झाला होता. पण त्या मागचं कारण आजही समोर येऊ शकलं नाही.

मर्लिन मुनरोच्या अनेक गोष्टींचा लिलाव करण्यात आला. त्यात तिला आलेल्या आणि तिने लिहिलेल्या प्रेम पत्रांचाही समावेश होता. मर्लिन मुनरोने पती आर्थर मिलरला लिहिलेल्या पत्राला एका व्यक्तीने 44,000 डॉलरमध्ये खरेदी केले होते.

मर्लिन मुनरोचा मृत्यू झोपेच्या गोळ्यांचा डोस जास्त घेतल्याने झाला होता. पण त्या मागचं कारण आजही समोर येऊ शकलं नाही.