इमारत नव्हे, मृत्यूचा सापळा! मुंबईत चार मजली इमारतीचा भास कोसळून मोठी दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 01:31 PM2019-07-16T13:31:56+5:302019-07-16T13:37:11+5:30

मुंबईच्या डोंगरी भागातील कौसरबाग इमारतीचा निम्मा भाग दुपारी १२ च्या सुमारास कोसळली.

कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 40 ते 50 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

इमारत कोसळताच परिसरात खळबळ उडाली. स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली.

घटनास्थळी एनडीआरएफ, पोलीस आणि अग्नीशमन दलाचे जवान यांच्याकडून बचाव कार्य सुरू आहे.

कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

परिसरातील गल्ल्या अतिशय अरुंद असल्यानं बचाव कार्यात अनेक अडथळे येत आहेत.

कौसरबाग इमारतीच्या आजूबाजूला असलेल्या तीन-चार इमारतीदेखील रिकाम्या करण्याचं काम सुरु आहे. या सर्व इमारती जुन्या असल्यानं त्या धोकादायक असल्याचं सांगण्यात येत आहे.