शेतकरी मोर्चासाठी शिवारातून शहरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 10:33 AM2018-03-12T10:33:26+5:302018-03-12T10:33:26+5:30

अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून निघालेला शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांचा लाँग मार्च अखेर सोमवारी पहाटे मुंबईत दाखल झाला.

या लाँग मार्चमध्ये तब्बल 40 हजाराहून अधिक शेतकरी सहभागी झाली आहे.

6 मार्चला नाशिकहून निघालेला हा मोर्चा 166 किलोमीटरची पायपीट करून मुंबईत पोहोचला आहे.

रविवारी सोमय्या मैदानात विसावलेल्या या महामोर्चाने आज रात्री एकच्या सुमारास सोमय्या मैदानाकडून आझाद मैदानाकडे कूच करत पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास आझाद मैदान गाठले.

शेतकऱ्यांनी एवढ्या मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने कूच केल्याने सरकारला गेल्या दोन दिवसांपासून चांगलीच धडकी भरली आहे.

सरकार खडबडून जागे झाले असून शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेण्यासाठी एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ स्थापन केले आहे.

सरकारचे शिष्टमंडळ आणि अखिल भारतीय किसान सभेच्या प्रतिनिधींची दुपारी 2 वाजता बैठक होणार आहे.

अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून निघालेला शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांचा लाँग मार्च अखेर सोमवारी पहाटे मुंबईत दाखल झाला.