शाळेत पुन्हा किलबिलाट!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2018 05:42 PM2018-06-15T17:42:24+5:302018-06-15T17:53:32+5:30

मुंबई : राज्यभरात नव्या शैक्षणिक वर्षाला सुरवात होत आहे. त्यामुळे राज्यभरातील शाळा आजपासून सुरु झाल्या आहेत. पहिल्या दिवसाचे औचित्य साधून परळ येथील शिरोडकर शाळेतील विद्यार्थीचे गुलाब फुल देऊन स्वागत केले.

विद्यार्थिनींनी रांगोळी काढून शाळेतील वर्गात प्रवेश केला.

शाळेत नव्यानेच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी पहिल्याच दिवशी खेळण्यात रंगले.

मराठी शाळेचा दर्जा वाढवा यासाठी संपूर्ण शाळेचे वर्ग डिजिटल क्लासरूम केले जाणार आहे. ( सर्व फोटो - सुशील कदम)