कठुआ-उन्नाव घटनेच्या निषेधार्थ सर्वसामान्यांसह बॉलिवूड उतरलं रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2018 03:11 PM2018-04-16T15:11:42+5:302018-04-16T15:11:42+5:30

जम्मू-काश्मीरमधील कठुआमध्ये घडलेल्या आसिफ बलात्कार व हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हळहळला आहे.

आसिफाला न्याय देण्याच्या मागणीसाठी सगळीकडेच निदर्शनं होत आहेत.

मुंबईतही रविवारी संध्याकाळी निदर्शनं करण्यात आली.

मुंबईतील कार्टर रोडवर सर्वसामान्य नागरिकांसह सेलिब्रेटीही रस्त्यावर उतरले होते.

राजकुमार राव, ट्विकल खन्ना, कल्की कोचिन, अदिती राव हैदरी, किरण राव हे कलाकार निदर्शनात सहभागी झाले होते.

'आसिफाला न्याय द्या', या आशयाचे बॅनर हातात घेऊन सर्वसामान्य व सेलिब्रेटी कार्टर रोडवर जमले होते.