'राज'पुत्राच्या लग्नात वऱ्हाडी कोण कोण; अमित ठाकरेंना आशीर्वाद देण्यासाठी हे खास पाहुणे होते उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 10:41 PM2019-01-27T22:41:51+5:302019-01-27T22:55:08+5:30

मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा शुभ विवाह आज मुंबईतील सेंट रेगीस हॉटेलमध्ये संपन्न झाला. यावेळी नवदाम्पत्यास आशीर्वाद देण्यासाठी ठाकरे कुटुंबीयांसोबत विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्या सोहळ्याची लोकमतचे छायाचित्रकार सुशील कदम यांनी टिपलेली ही क्षणचित्रे.

अमित ठाकरे यांना आशीर्वाद देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह इतर ठाकरे कुटुंबीय उपस्थित होते.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या विवाह सोहळ्यामध्ये नवदाम्पत्यास शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवदाम्पत्यास आशीर्वाद दिले.

उद्योगपती रतन टाटा यांनीही विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवदाम्पत्यास आशीर्वाद दिले.

या विवाह सोहळ्याला माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे हे सहपरिवार उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विवाह सोहळ्याला उपस्थित राहून नवदाम्पत्यास आशीर्वाद दिले.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही विवाह सोहळ्यास उपस्थित राहून उभयतांस शुभेच्छा दिल्या.

जेष्ठ अभिनेत्री सुलोचना यासुद्धा या विवाह सोहळ्यास उपस्थित होत्या. त्यांचे आशीर्वाद घेताना अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे.

अभिनेता आमीर खान यानेही विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवदाम्पत्यास शुभेच्छा दिल्या.

विवाह सोहळ्याला उपस्थित असलेला वऱ्हाडी मंडळी