मुकेश अंबानींच्या सूनेला आशीर्वाद देण्यासाठी पोहोचले बॉलिवूड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 03:14 PM2018-03-27T15:14:36+5:302018-03-27T15:14:36+5:30

देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलगा आकाश अंबानी व हि-यांचे व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी श्लोकाचा साखरपुडा थाटामाटात पार पडला आहे. 24 मार्चला गोव्यामध्ये हा सोहळा पार पडला. यानंतर सोमवारी (26 मार्च)अंबानी परिवारानं मुंबईत सेलिब्रिटींसोबत याचा जल्लोष साजरा केला.

या जल्लोषात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सहभागी झाले होते. शाहरुख खान, कतरिना कैफ, ऐश्वर्या राय-बच्चन, करण जोहर आणि किरण राव यांसारखे सेलिब्रिटी सहभागी झाले होते.

पार्टीमध्ये सहभागी झालेल्या सेलिब्रिटींनी आकाश आणि श्लोकाला शुभेच्छा दिल्या.

सेलिब्रिटी 'एंटिला' येथे दाखल होण्यापूर्वी श्लोका मेहता व आकाश अंबानी मीडियासमोर आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार आकाश व श्लोका डिसेंबर 2018मध्ये लग्न करणार असल्याचे माहिती समोर आली आहे.

साखरपुडा झाल्यानंतर श्लोका व आकाशानं कुटुंबीयांसोबत सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन घेतले.