मुंबईत अग्नितांडव सुरूच ! रे रोडमधील गोदामं जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2018 03:10 PM2018-01-09T15:10:15+5:302018-01-09T15:13:56+5:30

रे रोड परिसरातील एका वेल्डिंगच्या दुकानाला सोमवारी (8 जानेवारी) रात्री उशीरा भीषण आग लागली होती.

या दुर्घटनेत सुमारे सात दुकाने व गोदामे जळून खाक झालीयेत.

अग्नितांडवात दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे, मात्र सुदैवानं जीवितहानी झालेली नाही

अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

दुर्घटनेत मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे.