OMG...! करिश्मा तन्नासोबतचा हा अनोळखी व्यक्ती आहे तरी कोण?, फोटो होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 06:07 PM2019-05-11T18:07:41+5:302019-05-11T18:09:14+5:30

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री करिश्मा तन्ना हिने नुकतेच इंस्टाग्रामवर एका अनोळखी व्यक्तीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो व्हायरल होत असून यावर उलटसुलट चर्चा होते आहे.

करिश्माने नुकतेच कामातून ब्रेक घेत ब्लॅक अँड व्हाईटमध्ये फोटोशूट केले आहे. या फोटोत ती कुणाच्या तरी आठवणीत हरवलेली दिसतेय.

करिश्मा शेवटची बॉलिवूडमध्ये 'संजू' चित्रपटात दिसली होती.

'संजू'मध्ये ती रणबीर कपूरसोबत रोमांस करताना पहायला मिळाली होती.

करिश्मा सध्या सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे.

तिचे इंस्टाग्रामवर २७ लाखांहून जास्त फॉलोवर्स आहेत.

करिश्माने 'क्योंकि सास भी कभी बहू थी' मालिकेतून अभिनय क्षेत्रातील कारकीर्दीला सुरूवात केली होती.