मौनी रॉयचा ऑफ शोल्डर ड्रेसमधील ग्लॅमरस लूक, चाहते फोटोंवर बोलले झक्कास!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 08:17 PM2019-04-17T20:17:38+5:302019-04-17T20:19:37+5:30

मौनी रॉयचा नुकताच रोमिओ अकबर वॉल्टर चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिच्यासोबत जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत होता.

छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर एन्ट्री केलेली मौनी सोशल मीडियावरील हॉट अंदाजामुळे चर्चेत असते.

मौनीने मागील वर्षी अक्षय कुमार अभिनीत गोल्ड चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.

गोल्डमध्ये मौनीने अक्षय कुमारच्या पत्नीची भूमिका केली होती. या भूमिकेला प्रेक्षकांची चांगली दाद मिळाली.

मौनी सोशल मीडियावर सक्रीय असते आणि ती तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

मौनी लवकरच ब्रह्मास्त्र चित्रपटात झळकणार असून सध्या ती या चित्रपटात व्यस्त आहे.

ब्रह्मास्त्रमध्ये मौनीसोबत आलिया भट, अमिताभ बच्चन व रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्र चित्रपट या वर्षाखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.