Happy Birthday Esha : ईशा गुप्ताच्या या फोटोंनी लावली होती इंटरनेटवर आग!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 12:38 PM2018-11-28T12:38:09+5:302018-11-28T13:49:52+5:30

बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता हिचा आज (28 नोव्हेंबर) वाढदिवस. आज ईशा आपला ३३ वा वाढदिवस साजरा करतेय. याच ईशाने ‘बादशाहो’ या चित्रपटाच्या रिलीजवेळी स्वत:चे बोल्ड अन् न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर करून खळबळ उडवली होती.

ईशाला बॉलिवूडची ‘अँजेलिना जोली’ म्हटले जाते. ईशा कायम आपल्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते.

‘बादशाहो’च्या ऐन रिलीजच्या तोंडावर ईशाने आपल्या पर्सनल अकाऊंट न्यूड फोटोशूट केले होते. हे फोटो आगीसारखे व्हायरल झाले होते.

या फोटोंमुळे ईशा प्रचंड ट्रोल झाली होती. यानंतर तिने हे फोटो आपल्या आॅफिशिअल अकाऊंटवरून डिलिटही केले होते.

‘जन्नत 2’ या चित्रपटाद्वारे तिने आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात ती इमरान हाश्मीच्या अपोझिट दिसली होती.

२००७ मध्ये मिस इंडिया इंटरनॅशनल हा किताब आपल्या नावावर करणारी ईशा बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

सोशल मीडियावर ती कमालीची अ‍ॅक्टिव्ह असते. लवकरच ती ‘आंखे 2’मध्ये दिसणार आहे.