आर्ची उर्फ रिंकू राजगुरूचा कोणता अंदाज तुम्हाला भावतो... देसी की ग्लॅम?, See Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2019 12:15 PM2019-07-07T12:15:00+5:302019-07-07T12:15:00+5:30

'सैराट' सिनेमानंतर रिंकू राजगुरु हिने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. इतकंच नाही तर 'सैराट' या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. सैराटच्या यशानंतर रिंकूने कधीच मागे वळून पाहिलं नाही.

रिंकू सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासोबत शेअर करत असते. तिचे विविध अंदाजातील आणि तिच्या चित्रपटाच्या संबंधीत असलेले फोटो ती यावर पोस्ट करत असते. तिच्या सगळ्याच फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो.

काही दिवसांपूर्वी रिंकूने तिचा पार्टी गाऊनमधला फोटो इन्स्टावर शेअर केला होता. ज्यात ती खूपच ब्युटीफूल आणि ग्लॅमरस दिसत होती. फोटोतला हा लूक रिंकूच्या फॅन्सना चांगलाच भावला होता.

त्यातील एका फोटोंमध्ये ती बसलेली असून गोड स्माईल देताना दिसतेय.

त्यानंतर आता तिने रेड रंगाच्या आऊटफिटमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

रिंकुने रेड व गोल्डन रंगाचा वेस्टर्न आऊटफिट एका पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने परिधान केला होता. या आऊटफिटमधील फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

तर दुसऱ्या फोटोंमध्ये ती स्टेजवर रसिकांना एका वेगळ्या लूकमध्ये पाहताना दिसतेय.

तिच्या या फोटोंना तिचे चाहते भरभरून प्रतिसाद देत आहेत.