प्रिया बापटचं नवं फोटोशूट पाहून म्हणाल, उफ्फ... मार ही डाला!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 07:15 AM2019-07-20T07:15:00+5:302019-07-20T07:15:00+5:30

अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते.

ती सोशल मीडियावर फोटोजही शेअर करत असते आणि या फोटोंतून ती प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडताना पहायला मिळते.

सात वर्षानंतर प्रिया आणि उमेश पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. आणि काय हवं? या वेबसिरीजमध्ये एकत्र दिसणार आहे.

२०१३ साली 'टाईम प्लिज' सिनेमात उमेश आणि प्रिया ही गोड जोडी एकत्र झळकली होती. त्यानंतर हे दोघेही एकत्र झळकले नाहीत. त्यामुळे हे दोघेही कधी ऑनस्क्रीन पाहायला मिळणार याचीच चाहते आतुरतेने वाट पाहात होते.

काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. नागेश कुकुनूर यांनी या वेबसीरिजचे दिग्दर्शन केले आहे. या वेब सीरिजमध्ये काही बोल्ड सीन्स प्रियाने दिले आहेत.

'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.

या सर्व चित्रपटांमध्ये प्रियाच्या अभिनयाचे प्रेक्षकांसोबत समीक्षकांनीही कौतुक केले.

प्रियाच्या नव्या फोटोशूटला प्रेक्षकांची खूप चांगली दाद मिळते आहे.