लकी फेम दीप्ती सतीच्या बोल्ड फोटोजने चाहत्यांची केली बोलती बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 08:14 PM2019-04-05T20:14:32+5:302019-04-05T20:17:35+5:30

अभिनेत्री दीप्ती सतीच्या हॉट फोटोंनी सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ माजवली आहे.

दीप्तीने नुकतेच इंस्टाग्राम अकाउंटवर बोल्ड फोटो शेअर केले आहेत आणि या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.

दीप्तीने २०१५ साली नीना या मल्याळम चित्रपटातून दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले.

त्यानंतर दीप्तीने तेलगू, मराठी व तमीळ या भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दीप्ती सोशल मीडियावर खूप सक्रीय असून तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

दीप्तीचे इंस्टाग्रामवर ४ लाख १५ हजारहून अधिक लोक फॉलो करत आहेत.

दीप्तीचा जन्म २९ जानेवारीला मुंबईत झाला.

अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी दीप्तीने बऱ्याच ब्रॅण्डसाठी मॉडेलिंग देखील केले आहे.

काही महिन्यांपूर्वी तिने संजय जाधव दिग्दर्शित लकी चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या कामाचे खूप कौतूक झाले.