वन्यजीवांचा लागतो लळा अन् निसर्गाशी जुळतात ऋणानुबंध

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 12:09 AM2018-01-31T00:09:15+5:302018-01-31T17:26:20+5:30

चंद्रपूर जिल्ह्यात असलेलं अंधारी व्याघ्र प्रकल्प ताडोबा या नावाने ओळखले जाते. (सर्व छायाचित्रे- प्रशांत खरोटे)

ताडोबा अभयारण्य पट्टेरी वाघांच्या वास्तव्यासाठी जगप्रसिद्ध आहे. ‘अभयारण्य’ या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे.

या अरण्यात फिरताना वन्यजीव मुक्तपणे विहार करत असतात, तर आम्ही मनुष्यप्राणी त्यांच्या प्रदेशात जणू जिप्सीमध्ये कैदच होतो अन् ते होणे स्वभाविक आहे.

ताडोबा हे वाघ, सांबर, मगर, वानर, हरिण यांसारख्या विविध वन्यजीव प्राण्यांच्या वास्तव्यासाठी ओळखले जाते.

ताडोबा अभायरण्यात मोठ्या प्रमाणात मगरींचे वास्तव्य आहे.