सामाजिक एकतेचा संदेश देण्यासाठी सांगलीत सद्भावना रॅलीचं आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2018 08:27 PM2018-01-14T20:27:21+5:302018-01-14T20:33:15+5:30

मकरसंक्रांतीचे औचित्य साधून सामाजिक एकतेचा संदेश देण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सांगलीत सद्भावना रॅलीचं रविवारी आयोजन करण्यात आलं.

जिल्हा प्रशासनातर्फे कर्मवीर चौकातून सकाळी नऊ वाजता रॅलीस प्रारंभ झाला.

रॅलीत महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील उपस्थित होते.

जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख शशिकांत बोराटे यांच्यासह सांगली, मिरजेतील विविध शाळांमधील विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते.

शहरातील विविध मार्गावरून फिरून रॅली छत्रपती शिवाजी स्टेडियमवर गेली. तिथे एकतेची शपथ दिल्यानंतर रॅलीचा समारोप झाला.