राज्य सरकारविरोधात विरोधकांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 04:45 PM2017-12-12T16:45:13+5:302017-12-12T16:59:28+5:30

दीक्षाभूमीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश हल्लाबोल मोर्चाला सुरुवात झाली

गुलाम नबी आझाद, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते या मोर्चात सहभागी झाले होते.

नागपुरातील मॉरिस कॉलेज चौकात मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. यावेळी विरोधी पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

सभास्थळी काँग्रेसच्या तिरंग्यात रंगलेले कार्यकर्ते लक्ष वेधून घेत होते.

जनआक्रोश आणि हल्लाबोल मोर्चानंतर झालेल्या जाहीर सभेसाठी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधान सभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अजितदादा पवार आदि नेते उपस्थित होते.