Raksha Bandhan Special : नाशिकमध्ये अडीच लाख रुपयांची राखी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 10:40 AM2018-08-25T10:40:37+5:302018-08-25T10:45:43+5:30

नाशिक : रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या नात्याला घट्ट करणार सण रविवारी (26 ऑगस्ट) साजरा होत आहे. बाजारामध्ये राखी खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे.

नाशिकचे बाफना डायमंडसचे संचालक जयेश बाफना यांनी नावीन्यपूर्ण अशी राखी तयार केली आहे. जयेश बाफना यांनी तयार केलेल्या राखीसाठी 18 ग्रॅम सोने आणि 2.5 कॅरट डायमंड वापरला आहे.

राखीच्या मध्यभागी वापण्यात आलेला डायमंड युनिक कलरचा आहे. या राखीची किंमत जवळपास 2.5 लाख इतकी आहे.

सध्या, बाजारात स्टोन राखी, गोंड्याची राखी, ब्रेसलेट राखी, कार्टूनची राखी, डायमंड राखी, मारवाडी राखी, लायटिंगची राखी अशा विविध प्रकारच्या फॅन्सी राख्या उपलब्ध आहेत.