पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2018 08:50 PM2018-02-18T20:50:21+5:302018-02-18T21:00:42+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन करण्यात आले.(सर्व छायाचित्रं- भालचंद्र जुमलेदार)

जेएनपीटीच्या चौथ्या बंदराचे मोदींनी उद्घाटन केले. त्यानंतर सभास्थळी उपस्थितांना मोदींनी संबोधित केले.

एव्हिएशन सेक्टरमधील सुधारणांमुळे देशातील पर्यटन क्षेत्रास चालना मिळणार असल्याचे सूतोवाच मोदींनी केले आहेत.

लटकाना.. अटकाना.. पटकाना हे पूर्वीच्या सरकारचे धोरण होते, असं म्हणत त्यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला आहे.

2022पर्यंत नवी मुंबईचं चित्र पालटणार असून, हवाई वाहतूक, रस्ते वाहतुकीत मोठे बदल झालेले दिसतील. तसेच शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय स्मारकासह सर्व महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण होणार आहेत, असं मोदी म्हणालेत.