भीमा-कोरेगाव हिंसाचाराचं लोण मुंबईत, अनेक ठिकाणी आंदोलकांचा रास्ता रोको

By ऑनलाइन लोकमत on Tue, January 02, 2018 11:24pm

भीमा-कोरेगाव येथे संघर्षाचे लोण राज्याच्या वेगवेगळ्या भागात पसरले असून मुंबईतही हिंसक पडसाद उमटले आहेत.
चेंबूर, गोवंडी येथे रेल रोको झाल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.
मुंबईत आज वेगवेगळया भागात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. चेंबूर, सायन-पनवेल मार्गावरील वाहतूक रोखून धरली होती.
चेंबूर, मुलुंड, कुर्ला, गोवंडी परिसरात मोठया प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दल आणि 400 अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
चेंबूर येथील अमर महाल, घाटकोपर इथे दगडफेकीच्या घटना घडल्या. भीमा-कोरेगाव हिंसाचारामुळे अहमदनगर, औरंगाबाद येथे जाणारी बससेवा बंद करण्यात आली.

संबंधित

जलमय मुंबई, जिकडे तिकडे पाणीच पाणी....
ट्रेकिंगला जायचंय? मुंबईजवळच्या 'या' पाच किल्ल्यांचा नक्की विचार करा
अंधेरी स्टेशनवर पादचारी पुलाचा भाग कोसळला
मुंबईची वाढली शान; 'या' वास्तूंना मिळाला जागतिक वारशाचा मान
#BiggBossMarathi चे घर झाले एका बसमध्ये बंदिस्त, प्रेक्षकांना पाहण्यासाठी घर केले खुले

महाराष्ट्र कडून आणखी

पावसाचे हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच आठवणीत चिंब भिजाल!
चाँद नजर आया! राज्यभरात ईदचा उत्साह शिगेला!
अमरावतीत आकर्षक कॅक्टस गार्डनची पर्यटकांना भुरळ
नाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज
पाणीटंचाईची भीषणता!

आणखी वाचा