पुण्यातील निसर्गसंपदेनं नटलेल्या गावांतील अफलातून सौंदर्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2017 10:43 PM2017-10-08T22:43:42+5:302017-10-08T22:47:17+5:30

पुण्यापासून 30-40 किमी अंतरावर वसलेला राजगड किल्ला हा निसर्गसंपदेनं परिपूर्ण आहे.

पुणे ते सिंहगड मार्ग आणि पुढे पानशेतकडे जाणारा मार्ग असल्यानं इथे पर्यटकांची गर्दी असते.

या मार्गावर छोटी छोटी गावे असून, निसर्गाच्या कुशीत वसलेली ही गावे अनेकांना आकर्षित करतात.

गर्द हिरव्या डोंगराच्या मधोमध ढगांचा लांबच लांब शुभ्र पट्टा आल्हाददायक वाटतो.

डोंगरद-यांमधून धुक्याचे ढग मनसोक्त फिरताना इथे पाहायला मिळतात.

निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या या गावातील रस्त्यांवर अनेकदा मोरांचंही दर्शन होतं.

टॅग्स :निसर्गNature