42 किलोच्या खंडा तलवारीचे 'मर्दानी खेळ' ; तब्बल 15 तास रंगला जेजुरीचा 'मर्दानी दसरा'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2017 11:54 PM2017-10-01T23:54:30+5:302017-10-01T23:58:21+5:30

महाराष्ट्राचे लोकदैवत असण-या खंडेरायाच्या सोन्याच्या जेजुरी नगरीत दरवर्षी पारंपारीक पद्धतीने “मर्दानी दसर्याचे” आयोजन करण्यात येते, तब्बल 15 तासापेक्षाही जास्त काळ हा सोहळा खंडेरायाच्या गडावर संपन्न होत असतो. दस-याच्या दिवशी सायंकाळी 6 वाजता खंडेरायाची पालखी सीमोल्लघनाला गेल्यानंतर सुरु झालेला मर्दानी दसर्याची आज खंडा तलवारीचे मर्दानी खेळ संपन्न झाल्यानंतर समारोप झाला.

राज्यातील लाखो भाविक मर्दानी दसर्यासाठी खंडेरायाच्या गडावर दाखल झाले होते , अनेक वर्षापासून चालू असलेल्या ४२ किलोच्या खंडा तलवारीचे मर्दानी खेळ पाहून सारेच थक्क झाले.

येळकोट येळकोट ! जय मल्हार ! जल्लोष आणि भंडार्‍याच्या मुक्त उधळणीत उत्साह, आनंद आणि शक्तीची प्रेरणा अवघ्या महाराष्ट्राला देणार्‍या खंडेरायाच्या जेजुरीचे, उभ्या महाराष्ट्रत जेजुरीच्या खंडेरायाच्या दसरा सोहळ्याला “मर्दानी दसरा” म्हणून ओंळखले जाते.

खंडेरायाचा दसरा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक जेजुरीत आधीच दाखल होतात... , जेजुरीकर सुद्धा वर्षभर कुठेही असले तरी “दसर्या निमित्त” गडावर येऊन सोहळ्यात सहभागी होतच असतात.

मल्हारी मार्तंडाच्या वर्षभरात 12 मोठ्या यात्रा जरी भरत असल्या तरी या “दस-या ” च्या यात्रेला विशेष महत्व आहे.