लग्नानंतर 'या' कारणांमुळे मोडू शकतो संसार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2017 04:49 PM2017-12-27T16:49:55+5:302017-12-27T16:55:48+5:30

लग्नानंतर बहुतांश जोडप्यांमध्ये कुटुंबातील सदस्यांवरुन मतभेद निर्माण होतात. त्यामुळे लग्नानंतर आपण कुठे, कसं रहायचं या मुद्यांवर जोडीदारांबरोबर जरुर चर्चा करा.

लग्नानंतर लैंगिक सुख खूप महत्वाचे असते. त्यामुळे लैंगिक आयुष्याबद्दलही जरुर चर्चा करा. अनेक विवाह मोडण्यामध्ये हे सुद्धा एक महत्वाचे कारण असते.

अनेकदा लग्नानंतर जोडीदारांचे मुलांबद्दलचे विचार परस्परांशी जुळत नाहीत. मुलांच्या जन्माचे प्लानिंग, त्यांचे पालनपोषण, त्यांचे शिक्षण याबद्दलच्या विचारात मतभिन्नता असेल तर पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होतो.

आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न करण्यासाठी अनेकदा स्वत:ची आर्थिक स्थिती लपवली जाते. त्यामुळे लग्न करताना आपल्या जोडीदाराची आर्थिक स्थितीची सर्व माहिती घ्या.

अनेकदा विवाह मोडण्यामध्ये प्रोफेशनल लाइफ खूप मोठे कारण असते. एखाद्यावेळी नोकरीच्या निमित्ताने बाहेर जावे लागते किंवा घरी यायला उशिर होतो अशावेळी जोडीदाराने समजून घेणे महत्वाचे असते.