उन्हाळ्यात AC शिवाय Cool राहायचंय? मग 'हे' नक्की करा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 02:40 PM2019-04-17T14:40:26+5:302019-04-17T14:47:30+5:30

उन्हाळ्यात सर्वच जण उकाड्याने हैराण झालेले असतात. तापमानात वाढ झालेली असल्याने आरोग्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. अनेक जण AC चा वापर करतात. मात्र उन्हाळ्यात AC शिवाय कसं Cool राहायचं हे जाणून घेऊया.

उन्हाळ्यात शरिराची काळजी घेणं अत्यंत आवश्यक असते. तसेच तहान जास्त लागते. त्यामुळे भरपूर पाणी प्या.

घरामध्ये एग्जॉस्ट फॅन लावा. यामुळे घरातील गरम हवा बाहेर जाण्यास मदत होते. तसेच गरम हवा बाहेर गेल्यामुळे घरातील वातावरण थंड राहतं.

दुपारी खूप ऊन असतं अशावेळी घरातील दारं आणि खिडक्यांना पडदा लावा अथवा बंद ठेवा म्हणजे बाहेरची गरम हवा घरात येणार नाही.

उन्हाळ्यात खूप गरम होत असल्याने अधिक घाम येत असतो. त्यामुळे दिवसातून दोन वेळा थंड पाण्याने अंघोळ करा. यामुळे फ्रेश वाटेल.

घरामध्ये अनेकदा आवश्यकता नसतानाही बल्ब अथवा लाईट लावली जाते. वीजेच्या उपकरणामुळे जास्त गरम होतं. त्यामुळे आवश्यकता नसल्यास ते बंद करा.

अल्कोहल आणि कॅफीन शरिरासाठी चांगलं नसल्याने याचे सेवन शक्यतो टाळा. चहा आणि कॉफी पिण्याचे प्रमाण ही कमी करा.

कडक उन्हात बाहेर जाणं गरजेचं असेल तरच बाहेर पडा. उन्हामध्ये शॉपिंग करू नका. शॉपिंग करायचं असल्यास मॉलमध्ये जाण्याचा देखील पर्याय आहे.