थांबा ! वापरलेल्या टी बॅग्स फेकून देता?, असा करा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 06:29 PM2018-10-22T18:29:12+5:302018-10-22T18:32:02+5:30

1. फ्रिजमधील दुर्गंधी घालवा : फ्रिजची नियमित स्वच्छता होत नसल्यानं काही दिवसांनी फ्रिजमध्ये वास येऊ लागते. उग्र वास दूर करण्यासाठी टी-बॅगची चांगली मदत होते. वापर केलेली टी-बॅग फेकण्याऐवजी फ्रिजमध्ये ठेऊन द्या. यामुळे दुर्गंधी येणार नाही.

2. नैसर्गिक माऊथफ्रेशनर : ग्रीन टी किंवा पेपरमिंटसारख्या बॅग्सपासून तुम्ही नैसर्गिक माऊथफ्रेशनरही बनवू शकता. यासाठी टी बॅग्स गरम पाण्यात भिजवून थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर तुमचे नैसर्गिक माऊथफ्रेशनर झाले तयार.