पुस्तकातून उलगडणार ड्रीमगर्लचा जीवनप्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 01:38 PM2017-10-17T13:38:48+5:302017-10-17T13:56:25+5:30

सिनेसृष्टीतील ड्रीमगर्ल अर्थातच अभिनेत्री हेमामालिनी यांचा जीवनप्रवास पुस्तकाच्या माध्यमातून उलगडणार आहे.

अभिनेत्री दीपिका पादूकोण हिच्या उपस्थितीत या पुस्तकाचं अनावरण मुंबईतील एका भव्य कार्यक्रमात झालं.

'बियॉन्ड द ड्रीम गर्ल' (Beyond The Dream Girl) असं या पुस्तकाचं नाव असून ड्रीमगर्लच्या वाढदिवशी पुस्तकाचं अनावरण झालं.

एका प्रसिद्ध मासिकाचे माजी संपादक आणि निर्माते राम कमल मुखर्जी यांनी हेमामालिनी यांच्यावर आधारीत पुस्तक लिहिलं आहे.