लातूरजवळ क्रूझरची दोन गाड्यांना धडक, भीषण अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 10:05 AM2017-11-28T10:05:27+5:302017-11-28T10:07:22+5:30

लातूर-नांदेड राज्य महामार्गावरील कोळपा पाटीजवळ क्रूझरचा भीषण अपघात झाला

कोळपा पाटीजवळ थांबलेल्या टेम्पोला ओव्हरटेक करताना ही दुर्घटना घडली, या अपघातात 7 प्रवाशांचा मृत्यू असून 13 जण गंभीर जखमी आहेत

क्रूझरने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोला आणि समोरून येणाऱ्या दुसऱ्या क्रूझरला धडक बसून हा अपघात झाला

ही धडक इतकी जबरदस्त होती की गाडीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला

जखमींवर सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

मृत तसेच जखमींमध्ये लातूर, नांदेड, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील प्रवाशांचा समावेश आहे.