शाहूनगरीच्या परंपरेला गालबोट, कोल्हापुरात प्रचंड दगडफेक, वाहनांची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क on Wed, January 03, 2018 6:39pm

पोलिसांचा लाठीमार: अश्रुधुराचा वापर
‘कोल्हापूर बंद’ आणि उद्रेक
कोल्हापूर बंद’च्या पार्श्वभूमीवर दसरा चौकातील मैदानावर केएमटी बसेस थांबविण्यात आल्या होत्या. (छाया : नसीर अत्तार)
बिंदू चौकात संतप्त झालेल्या जमावाने रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या दुचाकी गाड्या एकत्र करून अक्षरश: दगड घालून त्यांची तोडफोड केली. (छाया : नसीर अत्तार)
शारदा कॅफे चौकात भीमसैनिक व हिंदुत्ववादी कार्यकर्ते समोरासमोर आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (छाया : नसीर अत्तार)
प्रक्षोभक बनलेल्या जमावातील कार्यकर्त्यांना करवीरचे पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी लाठीचा प्रसाद दिला. (छाया : नसीर अत्तार)
कोल्हापुरातील भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर भीमसैनिकांनी बुधवारी पुकारलेल्या ‘कोल्हापूर बंद’ला हिंसक वळण लागले. सकाळी भीमसैनिकांनी ‘बंद’चे आवाहन करण्यासाठी शहरातून मोर्चा काढला. या मोर्चात विश्वास देशमुख, दगडू कांबळे, उदय नारकर, आदी नेते सहभागी झाले होते. (छाया : नसीर अत्तार)
‘कोल्हापूर बंद’च्या पार्श्वभूमीवर नेहमी गजबजलेल्या पानलाईन मार्गावरील सर्व दुकानदारांनी आपले व्यवहार बंद ठेवले. (छाया : नसीर अत्तार)
सीपीआर चौकात हिदुत्ववादी कार्यकर्ते एकत्र आल्याने मोठी गर्दी झाली. (छाया : नसीर अत्तार)
बिंदू चौकात संतप्त झालेल्या जमावाने रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या दुचाकी गाड्या एकत्र करून अक्षरश: दगड घालून त्यांची तोडफोड केली. (छाया : नसीर अत्तार)
शाहूपुरीतून संतप्त हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते मोर्चाने दसरा चौकाच्या दिशेने आले.(छाया : नसीर अत्तार)
कोल्हापुरात दाभोळकर कॉर्नर चौकात टायर पेटवून रस्ता रोको करण्याचा प्रयत्न करणाºया आंदोलकांना हटवून पोलिसांनी टायर विझवला.

संबंधित

कोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल, तुल्यबळ लढतीचा संघर्षपूर्ण क्षण
सुट्यांच्या हंगाम : कोल्हापूरमध्ये पर्यटकांची संख्या वाढली
हापूस आंब्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात, कोल्हापूर बाजार समितीत लागल्या थप्प्या
कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर देवदासी मोर्चा
कोल्हापूर वूमेन्स लीग फुटबॉल स्पर्धा; सामना रंगला

कोल्हापूर कडून आणखी

आणखी वाचा