सळसळत्या मिरवणुका, पोवाडे, घोषणांनी दुमदुमले कोल्हापूर शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 08:11 PM2018-04-17T20:11:57+5:302018-04-17T20:11:57+5:30

फडफडणारे भगवे ध्वज, लहरणाऱ्या भगव्या पताका, शिवशाहिरांचे खडे बोल, जोडीला मर्दानी खेळ आणि अखंड चाललेला शिवघोष असे भारदस्त आणि मराठमोळे वातावरण मंगळवारी कोल्हापूरने अनुभवले. रात्री उशिरापर्यंत शहरातील मुख्य रस्त्यांवर शिवजयंतीचाच जल्लोष पाहावयास मिळाला.

शहरातील चौकाचौकांत मंडप उभारून शिवप्रभूंच्या पुतळ्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. छत्रपती शिवरायांच्या वेगवेगळ्या भावमुद्रा असणारे फलक सर्वच नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. मर्दानी खेळ, व्याख्याने, प्रतिमापूजन, पाळणा अशा विविध माध्यमांतून सिंहासनाधीश्वर शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.

कोल्हापूरातील मिरजकर तिकटी येथील राजर्षी शाहू तरुण मंडळ आयोजित मंगळवार पेठ शिवजयंती उत्सवाची सांगता मंगळवारी मिरवणुकीने करण्यात आली. यावेळी मिरवणूकीत मान्यवर सहभागी झाले होते.

कोल्हापूरातील मिरजकर तिकटी येथील राजर्षी शाहू तरुण मंडळ आयोजित मंगळवार पेठ शिवजयंती उत्सवाची सांगता मिरवणूकीने झाली. यात बाल शिवाजींची वेशभूषा केलेल्या बालकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

कोल्हापूरातील मिरजकर तिकटी येथील राजर्षी शाहू तरुण मंडळ आयोजित मंगळवार पेठ शिवजयंती उत्सवाची सांगता मंगळवारी मिरवणुकीने करण्यात आली. यावेळी मिरवणूकीत मान्यवर सहभागी झाले होते.

फडफडणारे भगवे ध्वज, लहरणाऱ्या भगव्या पताका, शिवशाहिरांचे खडे बोल, जोडीला मर्दानी खेळ आणि अखंड चाललेला शिवघोष असे भारदस्त आणि मराठमोळे वातावरण मंगळवारी कोल्हापूरने अनुभवले. रात्री उशिरापर्यंत शहरातील मुख्य रस्त्यांवर शिवजयंतीचाच जल्लोष पाहावयास मिळाला.

कोल्हापुरातील लाईन बझार परिसरातील ‘तडाखा तालीम मंडळा’ने शिवजयंतीनिमित्त असा देखणा महल उभारला आहे. त्याला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. (दीपक जाधव)