Lokmat Kolhapur Maha Marathon कोल्हापूरकर सुसाट...! अभूतपूर्व प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 07:45 PM2018-02-18T19:45:53+5:302018-02-18T20:05:53+5:30

‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये अनेक दिव्यांग बांधवांसह विशेष मुलांनी धाव घेत अन्य धावपटूंप्रमाणेच आपला उत्साह दाखवून ‘हम भी किसीसे कम नहीं’ हे दाखवून दिले.

फोटो ओळी : कोल्हापूरातील रविवारी झालेल्या लोकमत महामॅरेथॉन स्पर्धेत एस्कॉर्ट लाझर नाडर व डॉ. अमितसिंग माने यांच्यासह अमरजितसिंग चावला यांनी पूर्ण केली.

पोलीस मुख्यालयासमोर नंदू पिंटू ग्रुपने ढोल-ताशांचा गजर केला.

लोकमत महामॅरेथॉन’मध्ये आबालवृद्धांसह युवती, महिलांनीही अभूतपूर्व सहभाग घेतला. रविवारच्या सुटीला आरोग्याची साथ देत त्यांनी ‘फॅमिली रन विथ फन’चा आनंद लुटला.

ठिकठिकाणी महामॅरेथॉनचे आयकॉन असलेले सेल्फी पॉइंट, लोकमत वृत्तपत्राची प्रतिकृती या ठिकाणी सेल्फी आणि छायाचित्रे काढण्यासाठी सहभागी कुटुंबांनी, मित्रमैत्रिणींनी मोठी गर्दी केली होती. महामॅरेथॉनचे पिवळे टी-शर्ट,कॅप आणि गळ्यात मेडलचा आनंद सेल्फीने टिपला.

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील हे पत्नी रूपाली आणि मुलगा रणवीरयांच्यासमवेत सहभागी झाले.

आमदार चंद्रदीप नरके हे मुलगा देवराज याच्यासह सहभागी झाले.

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील आणि ‘लोकमत’चे कार्यकारी संचालक करण दर्डा

महामॅरेथॉनसाठी पहाटे पाच वाजल्यापासून आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके पोलीस ग्राउंडवर उपस्थित होते.