‘दाट’ धुक्यात हरविली कोल्हापूरकरांची ‘वाट’, चाहूल बोचऱ्या थंडीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 11:16 AM2017-12-13T11:16:35+5:302017-12-13T11:31:50+5:30

कोल्हापुरातील रंकाळा तलावाच्या परिसरातील राजघाट येथे सकाळी साडेआठ वाजता फिरायला येणाऱ्यांनी दाट धुके व बोचऱ्या थंडीचा अनुभव घेतला.

कोल्हापूर ते गगनबावडा राज्य महामार्गावरही मंगळवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास दाट धुक्यातून वाट काढताना नाकी नऊ आले. /छाया : आदित्य वेल्हाळ

रंकाळा तलाव येथे धुक्यात हरविलेल्या तलावासह आपलीही छबी मोबाईलमध्ये सेल्फीद्वारे घेण्याचा मोह सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना आवरता आला नाही. यात शिक्षकांसह विद्यार्थीही असे सहभागी झाले होते./छाया : आदित्य वेल्हाळ

कोल्हापुरातील पंचगंगा नदीकाठी मंगळवारी सकाळी दाट धुके व कडाक्याच्या थंडीत पर्यटनासाठी आलेल्या छकुलीनेही नदीच्या पाण्यात स्नान केले./छाया : आदित्य वेल्हाळ

कोल्हापुरातील पंचगंगा नदीकाठच्या रस्त्यावरून मंगळवारी सकाळी धुक्यातून वाट काढीत जाणारी बैलगाडी./छाया : आदित्य वेल्हाळ

कोल्हापुरातील महाराष्ट्र हायस्कूलच्या परिसरात धुक्यातही फुटबॉल खेळण्याचा आनंद घेणारी मुले. /छाया : आदित्य वेल्हाळ