कश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 09:40 PM2018-12-15T21:40:47+5:302018-12-15T21:50:16+5:30

कोल्हापूर : राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) राष्ट्रीय एकात्मता शिबिराचा प्रारंभ शनिवारपासून कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात झाला.

याशिबिरात कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात, तामीळनाडू, पाँडिचेरी, केरळ, राजस्थान, आसाम राज्यांतील ९९ विद्यार्थी आहेत.

तर महाराष्ट्रातील १३ विद्यापीठांतील १०० आणि गोवा राज्यातील ११ विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

एकूण याशिबिरात देशभरातील २१० विद्यार्थी सहभागी झाले आहे.

२१ डिसेंबरपर्यंत चालणा-या या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मतेचे धडे दिले जाणार आहेत. ( सर्व फोटो - दीपक जाधव)