पदरातून धरणीमातेच्या उदरात, कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पेरणीची धांदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 06:54 PM2018-05-29T18:54:03+5:302018-05-29T18:54:03+5:30

मान्सूनने केरळमध्ये प्रवेश केल्याने खरीप पेरणीची एकच धांदल उडाली असून रोटावेटरच्या सहाय्याने जमिनीच्या मशागतीची कामे जोरात सुरू आहेत. (छाया- आदित्य वेल्हाळ)

मशागत पूर्ण झालेल्या जमिनीत भातपेरणीस सुरू असून कळंबा परिसरात भाताची टोकण करण्यासाठी ‘रेगुल’ ओढताना शेतकरी. (छाया- आदित्य वेल्हाळ)

पेरणीपूर्वी बांध मजबूत करण्यासाठी माती ओढण्याचे कामही सुरू आहे. (छाया- आदित्य वेल्हाळ)

गेले महिना-दीड महिना उन्हा-तान्हात काळ्या आईची सेवा करून ‘मोत्यासारखे पीक दे,’ या आशेने पदरातील धान्य तिच्या उदरात टाकण्यासाठी बळिराजाची लगबग सुरू झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कात्यायनी परिसरात सध्या खरीप पेरणीची धांदल उडाली आहे. यंदा पाऊस काळ चांगला होऊन पिके डोलायला लागतील, या आशेने भाताची पेरणी करण्यात महिला मग्न झाल्या आहेत. (छाया- आदित्य वेल्हाळ)

मान्सूनने केरळमध्ये प्रवेश केल्याने खरीप पेरणीची एकच धांदल उडाली असून रोटावेटरच्या सहाय्याने जमिनीच्या मशागतीची कामे जोरात सुरू आहेत. (छाया- आदित्य वेल्हाळ)