कोल्हापूर लोकसभा मतदार संघात निवडणूक साहित्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 02:16 PM2019-04-22T14:16:00+5:302019-04-22T14:25:20+5:30

कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील निवडणूक कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्याचे वाटप सोमवारी सकाळी पेटाळा येथील राम गणेश गडकरी सभागृहात करण्यात आले. आपापल्या केंद्रावरील साहित्य घेवून कर्मचारी या महत्वाच्या मोहिमेवर रवाना झाले. (आदित्य वेल्हाळ)

कोल्हापूर लोकसभा मतदार संघामध्ये मंगळवारी मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक साहित्याचे वाटप सोमवारी सकाळी करण्यात आले. पेटाळा येथील राम गणेश गडकरी सभागृहांतून बंदोबस्ताचे वाटप झाल्यावर पोलिस कर्मचारी रवान झाले (आदित्य वेल्हाळ)

कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील निवडणूक कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्याचे वाटप सोमवारी सकाळी पेटाळा येथील राम गणेश गडकरी सभागृहात करण्यात आले. त्यावेळी अशी झुंबड उडाली होती. (आदित्य वेल्हाळ)

कोल्हापूरात निवडणूक कर्मचारी व साहित्यांची ने-आण करण्यासाठी खासगी वाहनांसह एसटी गाड्यांचीही मदत घेण्यात आली होती. तब्बल ४३७ एसटी गाड्या त्यासाठी तैनात करण्यात आल्या होत्या. (आदित्य वेल्हाळ)

कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातील निवडणूक कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्याचे वाटप सोमवारी सकाळी डॉ बापूजी साळुंखे सभागृहात करण्यात आले. त्यापूर्वी कर्मचाऱ्यांची हजेरी घेण्यात आली. (दीपक जाधव)

कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील निवडणूक कर्मचाऱ्यांना सोमवारी रमणमळा परिसरातील बहुउद्देशीय सभागृहात इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिनचे वाटप करण्यात आले. (दीपक जाधव)

कोल्हापूर जिल्हा निवडणूक प्रशासनाने एव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रे राजाराम तलावाशेजारील शासकीय गोदामात बंदोबस्तात ठेवली होती. सोमवारी सकाळी ही यंत्रे आणून त्याचे कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आले. (दीपक जाधव)

कोल्हापूर जिल्हा निवडणूक प्रशासनाने एव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रे राजाराम तलावाशेजारील शासकीय गोदामात बंदोबस्तात ठेवली होती. सोमवारी सकाळी ही यंत्रे आणून त्याचे कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आले. (दीपक जाधव)

कोल्हापूर लोकसभा मतदार संघात निवडणूकीसाठी पाठविण्यात येणाऱ्या पोलिस बंदोबस्ताचे वाटप सोमवारी झाले. (दीपक जाधव)

लोकसभेच्या निवडणूक साहित्याचे वाटप यंदा कापडी पिशव्यांतून करण्यात आले. (दीपक जाधव)

लोकसभा निवडणूकीसाठीचे मतदान एव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिनवर होणार आहे. ही यंत्रे ताब्यात आल्यानंतर ती कुतूहलतेने पाहून त्याची तपासणी करताना निवडणूक कर्मचारी (दीपक जाधव)

निवडणूक कर्मचाऱ्यांना इव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रांचे वाटप झाल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांसह हे सर्वजण एकत्रित केंद्रावर एसटी तून रवाना झाले. (दीपक जाधव)