प्रो-कबड्डी : पाटणा पायरेट्सचा सलग तिस-यांदा अंतिम फेरीत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2017 12:49 PM2017-10-27T12:49:00+5:302017-10-27T12:52:54+5:30

फॉर्मात असलेल्या प्रदीप नरवालच्या जोरदार चढायांच्या जोरावर पाटणा पायरेट्सने प्रो-कबड्डी लीगमध्ये बंगाल वॉरियर्सला ४७-४४ असे नमवून सलग तिस-यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला.

पाटणाकडून परदीपने ३६ चढायांमध्ये २३ गुण मिळवले. बंगालकडून मनिंदरसिंगने २१ चढायांत १७ गुण घेतले. मात्र, त्याला दीपक नरवालने १० गुण घेत त्याला चांगली साथ दिली.

जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये ही क्वालिफायर-२ची लढत रंगली. पाटणा पायरेट्स संघाने एलिमिनेटर-२ लढतीत हरियाणा स्टीलर्स, तर एलिमिनेटर-३ लढतीत पुणेरी पलटण संघाला नमवून क्वालिफायर-२ लढतीत प्रवेश केला होता.

दुसरीकडे, क्वालिफायर-१ लढतीत बंगाल वॉरियर्सला गुजरात फॉर्च्युनजायंट्स संघाकडून पराभव पत्करावा लागला होता. यंदाच्या मोसमात बंगालने पाटणाला एकदा नमविले होते, तर या दोघांमधील दोन लढती बरोबरीत सुटल्या होत्या.

पाटणा पायरेट्स संघाने सलग तिस-यांदा प्रो-कबड्डीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यांनी गेल्या वर्षीच्या दोन्ही मोसमात विजेतेपद पटकावले आहे. विजेतेपद राखण्यासाठी पाटणाची २८ ऑक्टोबरला गुजरात फॉर्च्युनजायंट्सविरुद्ध लढत होईल.