Pro Kabaddi- अटीतटीच्या लढाईत पुण्याची उत्तर प्रदेशवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 08:16 AM2017-10-24T08:16:33+5:302017-10-24T08:18:54+5:30

प्रो-कबड्डीच्या बाद फेरीच्या पहिल्या सामन्यात पुणेरी पलटणने उत्तर प्रदेशवर मात करत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे.

शेवटच्या सेकंदापर्यंत रंगलेल्या या सामन्यात पुणेरी पलटणने उत्तर प्रदेशचा ४०-३८ ने पराभव करत स्पर्धेतलं आपलं आव्हान कायम राखलं.

सामन्याच्या सुरुवातीला उत्तर प्रदेशच्या संघाने आक्रमक पवित्रा घेतला होता. सुरुवातीच्या काही मिनीटांमध्येच उत्तर प्रदेशच्या संघाने सामन्यात ५-० अशी आघाडी घेतली.

पहिल्या सत्रात ऑलआऊट झाल्यानंतर उत्तर प्रदेशच्या संघाकडे १०-३ अशी मोठी आघाडी होती. पण पुणेरी पलटणने जोरदार कमबॅक करत उत्तर प्रदेशला चांगलच आव्हान दिलं.