सावधान! 'या' Cleaning Hacks ठरू शकतात डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 05:06 PM2019-07-13T17:06:46+5:302019-07-13T17:37:19+5:30

सोशल साईटवर अनेकदा Cleaning Hacks देण्यात आलेल्या असतात. मात्र यातील सर्व Cleaning Hacks या उत्तम असतात असं नाही. तर काही हॅक्स डोकेदुखी ठरण्याची शक्यता असते. म्हणजेच काम कमी होण्याऐवजी ते जास्त वाढतं.

कोका कोला बेस्ट टॉयलेट क्लीनर असल्याचं म्हटलं जातं. कार्बोनेटेड सोड्यामध्ये कमी प्रमाणात सायट्रिक आणि फॉस्फोरिक अ‍ॅसिड असल्यामुळे काही डाग हटवण्यासाठी ते फायदेशीर ठरतं. मात्र यामुळे सर्वच बॅक्टेरिया मरत नाहीत. म्हणून त्याऐवजी चांगल्या दर्जाच्या टॉयलेट क्लीनरचा वापर करा.

कपडे धुण्यासाठी डिटर्जेंटचा वापर केला जातो. मात्र अनेकजण कपडे स्वच्छ व्हावेत यासाठी जास्त डिटर्जेंटचा वापर करतात. पण हे खरं नाही यामुळे कपडे खराब होण्याची जास्त शक्यता असते. तसेच डिटर्जेंटचा सारखा कपड्यांना वास येतो. त्यामुळे योग्य प्रमाणात त्याचा वापर करा.

गरम पाण्यामुळे जंतू मरतात असं म्हटलं जातं त्यामुळे काही जण साफसफाईसाठी गरम पाण्याचा वापर करतात. मात्र असं करू नका यामुळे भाजलं जाण्याची शक्यता ही अधिक असते.

स्वयंपाक करताना काही वेळा गॅसवर अनेक गोष्टी पडतात. त्यावेळी तेलाचे अथवा अन्य काही डाग स्वच्छ करण्यासाठी कार वॅक्सचा वापर केला जातो. कार वॅक्सच्या मदतीने सहजपणे सर्व स्वच्छ होतं. मात्र यामुळे आग लागण्याची शक्यता असते. त्यामुळे गॅससाठी त्याचा वापर करू नका.

हेअर स्प्रेमध्ये अल्कोहोल असल्याने शाईचे डाग हटवण्यास मदत होते. मात्र हल्लीच्या हेअर स्प्रेमध्ये कंडिशनर, तेल असतं ज्यामुळे शाईचे डाग जात नाहीत.

सॅनिटाईज स्पंजने अनेकजण मायक्रोव्हेव साफ करतात. मायक्रोव्हेवमधील गरम वातावरणामुळे आग लागण्याची शक्यता असते. (टिप : वरील सर्व गोष्टी या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही.)