या ४ गोष्टींमुळे दीपिका पदुकोन सर्वांना आवडते

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2018 03:01 PM2018-01-05T15:01:30+5:302018-01-05T15:11:42+5:30

बॉलिवूडची डिंपल क्वीन दीपिका पदुकोन हीचा आज ३१वा वाढदिवस. तिच्या फिगर, स्माईल, स्टाईल आणि लुकवर फिदा नाही असा क्वचितच कुणी आपल्याला सापडेल. अगदी डाय हार्ड फॅन नसला तरी ती आवडते असं म्हणणारे आपण बरेच जण आहोत. तिचा फॅन फॉलोईंग फार मोठा आहे मात्र तिचा द्वेष करणारे क्वचितच सापडतील. या काही गोष्टी आहेत ज्यांच्यामुळे ती सर्वांना आवडते. पाहुयात पुढच्या स्लाईडमध्ये-

१) खळीवाली स्माईल - तिच्या गालांवर पडणाऱ्या खळ्यांमुळे ती हसताना फार सुंदर आणि गोड दिसते. तिचं स्मितहास्यही तितकंच लोभस असतं. कुठेही वावरताना दीपिका आपल्या या प्लस पॉईंटमुळे कायम सर्वांत वरचढ चढते. चित्रपटात किंवा कोणत्याही इव्हेटमध्ये कोणत्याही पेहरावाला ही सुंदर स्माईल परिपुर्ण लुक देते.

२) उंची - एका मॉडेलला आवश्यक अशी तिची उंची तिचा प्लस पॉईंट म्हणता येईल. तिच्या या उंचीमुळेच तिचे अनेक आउटफीट तिला फार शोभून दिसतात. खरंतर कोणत्याही प्रकारच्या पेहरावात ती छानच दिसते मात्र काही कपडे तर फक्त तिच्या उंचीमुळे अजून छान वाटतात.

३) फिटनेस - वडिल स्पोर्ट पर्सनॅलिटी असल्यामुळे आपल्या फिटनेसबाबत दीपिका पुर्वीपासूनच सजग आहे. त्यातच तिने मॉडलिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर तर ती आपल्या फिगरबाबतही जागरुक झाली. तिच्यै शरीरयष्टीमुळे ती सर्वच अभिनेत्यांसोबत परफेक्ट वाटते. तसंच उंची आणि बॉडी फिगर हे तिच्याबाबत किलर कॉंम्बिनेशन ठरतं.

४) चित्रपटांची निवड - दीपिका पदुकोनने मॉडेलिंगपासून आपलं करिअर सुरु केलं असलं तरी नंतर ती चित्रपटांकडे वळली. हिमेश रेशमियाँच्या एका अल्बममध्ये ती दिसली होती. सुरुवातीला सोनम कपुर आणि रणबीर कपुरच्या ‘सावरियाँ’मधून दीपिकाचा बॉलिवूड प्रवेश निश्चित झाला होता. मात्र नंतर काहीतरी चक्र फिरली आणि तो चित्रपट तिच्या हातून गेला. नंतर मग शाहरुख खानसोबत ‘ओम शांती ओम’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. दोन्ही चित्रपट एकाच दिवशी रिलीज झाले मात्र दीपिकाच्या चित्रपटाने जास्त कमाई केली.

त्यानंतरही तिने मागे वळून पाहिले नाही. वेगवेगळे चित्रपट आणि जाहीरातींमधून ती कायम चित्रपटात येत राहिली. कॉकटेलसारख्या चित्रपटात इतका मॉड रोल केल्यानंतर ती मस्तानी म्हणूनही तितकीच परफेक्ट वाटली. तसंच तिने वेगवेगळ्या दिग्दर्शकांसोबत काम करत आपल्या अभिनयाला सिध्द केलं. बॉलिवूडमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वात वाईट अभिनय म्हणून हिणवली जाणारी दीपिका आता बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री आहे.